भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत  ना. मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण  संस्था भुम, परंडा, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने यश मंगल कार्यालय भूम येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर संपन्न झाला. 

या छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मेळाव्याचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, पीआय प्रल्हाद सूर्यवंशी, बाळासाहेब पाटील हांडोग्रिकर (आयएमसी सदस्य), बाळासाहेब क्षीरसागर( आयएमसी सदस्य), जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रवीण औताडे, हर्षद राजूरकर प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था भुम, संतोष कदम प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा, वाशी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आयटीआय हे कमी कालावधीत रोजगार मिळकवण्याचे उत्तम साधन आहें असे मनोगत वैशाली पाटील यांनी केले. 

चव्हाण व्ही. टी. यांनी 10 वी व 12 वी नंतर काय?, डॉ. विक्रमसिंह माने (प्राचार्य कॉलज ऑफ इंजिनीरिंग धाराशिव) यांनी उच्च व तंत्र शिक्षण, ऋषिकेश काटे यांनी वक्तिमत्व विकास,  अक्षय घोडके यांनी जिल्हा उद्योग केंद्याच्या विविध योजना, कृष्णा तांदळे यांनी बियोडाटा व मुलखत तयारी,  सोमनाथ गुंजाळ  यांनी व्यवसाय व करिअर मार्गदर्शन केले. 

या मेळाव्याचे प्रास्ताविक हर्षद राजूरकर  यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  दिनेश मुळे, प्रणय भोंडेकर, अनिकेत खिलारे, सुदीप महाजन, सुधीर जोशी, रविंद्र वीर, मीना चौरे, हर्षद कळबड, अगाव संजित, रामेश्वर जाधवर, अवधूत गवळी,दादा गवळी, राजाभाऊ देवकते, बळीराम ढाकणे, दीपक गुडे, बालाजी वाघमारे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य संतोष कदम  यांनी केले.

 
Top