तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील  बोरी शिवारातील चिवचिवे डीपी नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात जळाली आहे. तरी येथे नवीन डीपी बसवुन विजपुरवठा सुरु करण्याची मागणी शिवारातील शेतकऱ्यांनी महावितरण अभियंत्याकडे अर्ज देवून केली आहे. बोरी शिवारातील गट नंबर 84 मधील विद्युत पुरवठा डीपी शाँर्टसर्कीट होवुन जळाली आहे. यामुळे बोअरवेल, विहारीचे पाणी मुक्या जनावरांना ही पाजणे शक्य होत नसल्याने तरी त्वरीत नवीन डीपी बसवुन देवुन मुक्या प्राण्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे. 

 
Top