कळंब (प्रतिनिधी)- येथील बस आगार प्रशासना मार्फत रा. प. महामंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त कळंब बस स्थानकावर एस. टी. चा 76 वा वर्धापन दिन दि. 1 जून रोजी फीत कापून व  प्रवाशांना गुलाब फुले आणि मीठाई वाटून साजरा करण्यात आला. यावेळी बस स्थानकावर रांगोळी, केळीचे पाणे, तोरण बाधून स्थानक सजवण्यात आले होते. प्रवाशा बरोबरच वाहक, चालक यांचा सत्कार ही यावेळी केला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती हे होते. तर सहाय्यक वाहतूक अधीक्षक बालाजी मुळे, वाहतूक निरीक्षक अनंत कवडे हे उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमासा प्रमुख पाहुणे म्हणून प्रवासी मित्र प्रा. मोहन जाधव, कळबं तालुका मराठी प्रत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक,  ॲड. रामदास मुळे व कळंब आगारातील सर्व पर्यवेक्षक व कर्मचारी यांची उपस्थिती होती. तसेच प्रवाशांना साखर व पेढे वाटण्यात आले. या कार्यक्रमासाठी कार्यशाळा  सहाय्यक वाहतूक निरीक्षक अभिजीत धाकतोडे, प्रभाकर झांबरे, लखन कांबळे, नितीन गायकवाड, वाहतुक नियंत्रक सुशिल हुंबे,चेतन गोसावी, गोविंद जाधवर ,चालक शिवाजी बांगर, डी. एम. मुंडे, वाहक आबा  जगताप, विलास जाधव, अभिजीत गायकवाड, ज्योतीराम तौर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गणेश गोरे यांनी केले. तर महिला कर्मचाऱ्यांमध्ये श्रीमती अलका भोसले, प्रियंका शिंदे, तरमिम शेख, अश्विनी तिडके, अनुराधा पवार, वंदना पालके, संध्या कुमठेकर सह आदींनी पारिश्रम घेऊन एसटीचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला. 

 
Top