तुळजापूर (प्रतिनिधी)- लोकमंगल  परिवाराची बैठक शुक्रवार दि. 28 जून रोजी लोकमंगल मल्टीस्टेट ब़ँकेच्या तुळजापूर शाखेत लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष तथ भाजप  युवा नेते रोहन देशमुख यांच्या उपस्थितीत  होवुन यात आपण लोकसभा निवडणुकीत उतरणार असुन ही  विधानसभा निवडणुकीत ताकदीने लढविण्याचा निर्धार  करण्यात आला.

यावेळी कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना रोहन देशमुख म्हणाले कि,  कार्यकत्यांनी मतदारांशी संपर्क साधुन त्यांच्या अडअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. कुठे माझी मदत लागली तर मी मदतीस तयार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. या पुढे कार्यकत्यांनी कामाला लागावे असे शेवटी म्हणाले.

यावेळी अनिल जाधव, बाबा बेटकर, बालाजी शिंदे, बबन सोनवणे, मकरंद लबडे, अभिजीत लोके, अनंत बुरांडे, गुणवंत कोंनाळे सुहास साळुंखे,गिरीश देवलालकर, शिवाजी बोधले, सहतुळजापूर विधानसभा मतदार संघातील तुळजापूर तालुका  व धाराशिव तालुक्यातील तुळजापूर विधानसभा मतदर संघातील बहात्तर गावातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थितीत होते.

 
Top