मुकबधीर अल्पवयीन मुलीवर वस्तीगृहात अत्याचार केल्याप्रकरणी एका आरोपीस धाराशिव येथील जिल्हा प्रमुख न्यायाधीश अंजु शेंडे यांनी आजन्म कारावास व 1 लाख दंडाची शिक्षा ठोठावली आहे. धाराशिव पोलिसांच्या दामिनी पथकाने बालहक्क सुरक्षा सप्ताह सुरु असताना मुकबधिर निवासी शाळेस भेट दिल्यानंतर 6 विच्या वर्गातील एका मुलीने तिच्यावर वस्तीगृहातील काळजीवाहकाने लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. अत्याचार झाल्यानंतर या मुलीने कोणालाही काही सांगितले नव्हते. 43 दिवसानंतर दामिनी पथकामुळे हा गुन्हा उघडकीस आला. समोर आलेले पुरावे व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी शाहीर नाना आष्ट्रळ याला शिक्षा सुनावली.

20 नोव्हेंबर 2019 रोजी धाराशिव जिल्ह्यात पोलीस व बालकल्याण विभाग मार्फत बालहक्क सुरक्षा सप्ताह सुरु असताना एका शाळेत भेट दिली तेव्हा एका 6 वीच्या मुकबधीर मुलीने तिच्यावर काळजीवाहकाने लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. दिवाळीच्या सुट्ट्यात शाळेतील विद्यार्थी घरी गेले होते. तसेच स्वयंपाक करणारी मावशी घरी गेली असताना त्याने 2 वेळेस स्वयंपाक घरात व बाथरूममध्ये नेहून अत्याचार केले. त्यानुसार तुळजापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. याचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रीती सावंत यांनी करुन सहायक पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांनी दोषारोपपत्र दाखल केले. पीडितेचा जबाब व इतर कामात विशेष शिक्षिका वैशाली एडके यांनी सहकार्य करुन साईन लँग्वेजमधील घटना समजून घेतली. कोर्टात 17 साक्षीदार तपासण्यात आले.

कोर्टात सुनावणी दरम्यान पिडीत मुलीची साक्ष, तिची मैत्रिण, आई व वैद्यकीय अधिकारी, विशेष शिक्षिका यांची साक्ष महत्वाची ठरली, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही आर वाघमारे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. या केसची सुनावणी तात्कालीन अतिरिक्त सहजिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगताप यांच्याकडे झाली. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या प्रकरणाची सुनावणी शेंडे यांच्या कोर्टात झाली. त्यांनी शिक्षा सुनावली, दंडाची रक्कम पिडीत मुलीच्या आईला देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत आरोपीचे लग्न झालेले असून त्याला पिडीत मुलीच्या वयाची मुलगी असतानाही त्याने हे दुषकृत्य केले

 
Top