धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथे राष्ट्रीय रक्तदाता दिवस साजरा करण्यात आला. परिचारिका कर्मचारी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना संबोधित करताना वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. शिल्पा दोमकुंडवार यांनी रुग्णालयात रक्त पुरवठा कमी असुन रक्तदात्यांनी रक्तदानासाठी समोर येऊन रक्तदान करावे असे आवाहन केले.

मुख्य अधिसेविका सुमित्रा गोरे यांनी रुग्णालयात रक्ताची कमतरता आहे यासाठी त्यांनी सहकारी यांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करुन आजच्या राष्ट्रीय रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिरांचे आयोजन केले.या दिनाला स्मरुन विद्यार्थ्यांनी देखील रक्तदान केले. रक्तदात्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र वैद्यकीय अधिष्ठाता डॉ शिल्पा दोमकुंडवार, इथिकल कमिटी सदस्य गणेश वाघमारे, आरोग्य मित्र शेख रऊफ,रक्त विभाग प्रमुख डॉ. जयश्री किश्ते, वर्ग एक अधिकारी डॉ.भास्कर साबळे,रक्त संक्रमण अधिकारी डॉ.राजेंद्र लोंढे, सुपरवायझर विठ्ठल कांबळे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. रुग्ण कल्याण समिती व इथिकल कमिटीच्या वतीने रक्तदात्यांचा सन्मान ट्रॉफी देऊन हा उपक्रम राबविला जात आहे. रक्तदाते मुख्य अधिसेविका सुमित्रा गोरे, बालरुग्ण तज्ञ परिसेविका सुषमा शिंदे, बाल रुग्ण तज्ञ परिसेविका सिंधुबाई गायकवाड, परिसेविका प्रेमा कांबळे (निंबाळकर), सुरेखा गवई, सौजन्मता पंडित, बबिता पाटील, आदित्य कुटे, ओम भांगे, यश कांबळे यांनी रक्तदान केले. एकुण विस जणांनी रक्तदान केले. 

 
Top