भूम (प्रतिनिधी)-तालुक्यातील जिल्हा परिषदच्या 117 शाळेत मुख्याध्यापकांची तीन तर शिक्षकांची 35 अशी मिळून एकूण 38 पदे रिक्त आहेत. यामुळे 15 जूनपासून चालू होणाऱ्या नवीन शैक्षणि

क वर्षात उपलब्ध शिक्षकावरती कामाचा ताण पडणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर देखील परिणाम होणार आहे. सदरची पदे विशेष बाब म्हणून तात्काळ भरावीत अशी मागणी पालकांतून केली जात आहे.

15 जून पासून तालुक्यातील जिल्हा परिषद सह खाजगी शाळा चालू होणार आहेत. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या तीन प्रशालेसह एकूण 115 शाळा आहेत. यासाठी मुख्याध्यापकाची 17, प्राथमिक पदवीधर 109 आणि प्राथमिक शिक्षकाची 352 पदे मंजूर आहेत. सध्या 14 मुख्याध्यापक, 98 प्राथमिक पदवीधर आणि 328 प्राथमिक शिक्षक कार्यरत असून, मुख्याध्यापकाची तीन, पदवीधर 11 आणि प्राथमिक शिक्षकाची 24 अशी एकूण 38 पदे रिक्त आहेत. नुकत्याच झालेल्या समुपदेशनाने जिल्हा बदलीतून आठ जागा भरण्यात आल्या यामुळे आरसोली शाळेला दोन, वालवड प्रशाला एक, घाटनांदुर, अंजन सोंडा, यमायवस्ती, वाला वस्ती, पारधी वस्ती, गोलेगाव आणि आष्टावाडी या ठिकाणी प्रत्येकी एक शिक्षक उपलब्ध झाला आहे. अजूनही तालुक्यात 38 जागा रिक्त आहेत. दरम्यान आज पासून शैक्षणिक वर्ष चालू होणार असल्याने या शिक्षकांवरच अतिरिक्त कामाचा भार पडणार आहे. तेव्हा या बाबीकडे शासनाने लक्ष देऊन भूम तालुक्याच्या गुणवत्ता वाढीस हातभार लावावा अशी मागणी पालकांतून होत आहे.


 
Top