कळंब (प्रतिनिधी)-शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात प्रतीवर्षीप्रमाणे रासेयो विभागाच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांची 151 वी जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त डॉ.अशोकराव मोहेकर (सचिव ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा) यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक कार्य यावर प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी (सांस्कृतिक विभागप्रमुख) यांनी व्याख्यान दिले. 

आपल्या देशाला महापुरूषांच्या समृद्ध, परंपरा आणि विचारांचा वारसा आहे. तो जपणे आपले कर्तव्य आहे. असे मत सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी मांडले. स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय, बंधुता आणि उपेक्षितांच्या हक्कासाठी लढा दिला. त्यांचे विचार सतत ज्ञान आणि प्रेरणा देतात.

यावेळी प्राचार्य डॉ. सुनील पवार, उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान, संचालक मंडळ रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.संदीप महाजन, डॉ. मीनाक्षी जाधव डॉ. आर. व्ही. ताटीपामुल, डॉ. ईश्वर राठोड, डॉ. डी. एन. चिंत्ते, प्रा. पंडित पवार, डॉ.नामानंद साठे, प्रा. दादाराव गुंडरे, प्रबंधक हनुमंत जाधव, अरविंद शिंदे, प्रकाश शिंदे, इकबाल शेख, अमोल सुरवसे, उमेश साळुंखे,आदित्य मडके, भारत शेळके आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. नामांनंद साठे यांनी सूत्रसंचलन केले. तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. आर. व्ही. ताटीपामूल यांनी मानले. या कार्यक्रमासाठी अर्जुन वाघमारे आणि सत्यवान बंडगर यांनी परिश्रम घेतले.

 
Top