तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यात दुष्काळी संकटाशी दोन हात करणारा बळीराजा आपल्या काळ्या आईची ओटी भरण्यासाठी उधार, उसनेवारी करुन बी-बियाणे खरेदी करीत आहेत. मात्र एमआरपी नावाखाली शेतकऱ्यांना अधिक दराने बियाणे विकत  घ्यावे लागत आहे.  एमआरपीच्या नावाखाली शेतकऱ्यांची होणारी अर्थिक लूट कधी थांबणार? असा प्रश्न बळीराजातुन विचारला जात आहे. कृषीमंत्री धनंजय मुंढे यांनी या अर्थिक लूटीकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.

तुळजापूर तालुक्यात प्रथमच मृग नक्षत्र पाऊस वेळेवर पडल्याने शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी लवकरच भरण्यासाठी कर्ज काढुन, उधार, ऊसनेवारी करुन कृषी केंद्रावर गेलेल्या भाबड्या शेतकऱ्यांना कृषी केंद्रवाल्यांनी एमआरपी किंमत दाखवुन शंभर रुपये कमी करुन बी-बियाणे खत दिले. माञ याच कंपनीचे दर्जाचे  बी-बियाणे, खत दर  लातूर  सह अन्य शहरे, ग्रामीण भागातील गावांमध्ये हजार ते आठशे रुपये फरक दिसत आहे. एमआरपी नावाखाली आपली मोठी अर्थिक लूट केली जात असल्याचे दिसुन आल्याने लातुर काय परदेशात आहे का? 75 किलोमीटर भागात एकाच बि बियाणांचे दर वेगवेगळे कसे असु शकतात असा सवाल करुन शेतकऱ्यांनी या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त करीत असुन अन्नदात्याची अर्थिक लूट ही आगामी विधानसभा  सह अन्य निवडणुकांमध्ये सत्ताधारींना ञासदायक ठरणारी आहे.


एमआरपी धोरणाचा फेरविचार होणे गरजेचे- संपत जळके

एमआरपी नावाखाली ही लूट योग्य नाही. उत्पादन  किमत कमी असताना जादा  दराने उत्पादने विकणे चुकीचे आहे. शासनाने एमआरपी दरा बाबतीत धोरण तात्काळ बनवणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया ग्राहक पंचायतचे वरिष्ट पदाधिकारी संपत जळके यांनी दिली.


दरात भेदभाव निंदणीय -रविद्र इंगळे

बी-बियाणे, खते शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देताना दराबाबतीत जो शेतकऱ्यांमध्ये  भेदभाव केला जातो  हा शासनाचा आगळावेगळा कारभार निंदणीय आहे. सर्वच शेतकऱ्यांना समान दराने बी-बियाणे उपलब्ध करुन देणे कर्तव्य आहे. दरात तफावत समस्या न संपवल्यास स्वाभीमानी शेतकरी संघटना या प्रकरणी रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी दिला आहे.

 
Top