धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील चोराखळी येथील सुप्रिया मैंदाड हिने तीन स्पर्धा परिक्षेत यश मिळवले. त्याबद्दल तिचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी त्यांच्या घरी जावून सत्कार केला.

चोराखळी येथील बिभिषण व सविता मैंदाड या शेतकरी, शेतमजूर दांम्पत्याची सुप्रिया हिचे दहावीचे शिक्षण चोराखळी येथे झाले. लातूर येथे तंत्र निकेतनमध्ये तीन वर्षाचा अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर तिने पदवीच्या शिक्षणासाठी विश्वकर्मा टेक्नॉलॉजी पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना अभ्यासासोबतच स्पर्धा परिक्षेचाही अभ्यास केला. त्यासाठी नियोजन केले. शेवटच्या वर्षात नोव्हेंबर 2023 मध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंतापदाची परिक्षा दिली. 29 डिसेंबरला छत्रपती संभाजीनगरला जलसंपदा विभागात परिक्षा दिली. त्यानंतर यवतमाळ जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता पदाची परिक्षा दिली. दोन्ही जागी सुप्रियाची अभियंता म्हणून निवड झाली. वयाच्या 21 व्या वर्षी तीन शासकीय नौकरी मिळवणाऱ्या शेतकरी सुकन्येचा तिच्या घरी चोराखळी येथे जावून सत्कार करत शुभेच्छा दिल्या. तसेच आई-वडीलांचाही गुणगौरव केला. याप्रसंगी माजी सरपंच खंडेराव मैंदाड, बाबासाहेब साठे, माजी चेअरमन अशोक मैंदाड, डिगंबर मैंदाड, पाडूरंग शिंदे, चंद्रकांत कोकाटे, तुळशीदास मैदाड, ॲड. श्रीकांत मैंदाड, अंबादास शिंदे, आझाद शेख, वडील बिभिषण मैदाड, आई सविता मैंदाड आदी उपस्थित होते.

 
Top