धाराशिव (प्रतिनिधी) - न्यायाधीश, जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन पीडितांना न्याय देऊन सामाजिक सलोखा जोपासण्याचे काम करतात. अगदी त्याप्रमाणेच पत्रकार देखील त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून पिडीतांना न्याय देण्याचे काम करीत आहेत. मात्र पत्रकारांच्या अनेक समस्या असून त्या समस्याला न्याय देण्यासाठी समाजातील घटक पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे सरकारनेच पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा रहायला पाहिजे असे प्रतिपादन धनंजय शिंगाडे यांनी दि. 20 जून रोजी केले.

पत्रकारांच्या 10 वी, 12 वी, नीट व जईईमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत पाल्यांच्या सत्काराचे आयोजन व्हाईस ऑफ मीडिया धाराशिव तालुक्याच्यावतीने धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेजचे प्रा. रवी सुरवसे, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, धाराशिव तालुकाध्यक्ष अमजद सय्यद व साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते आदी उपस्थित होते. 

तर प्रमुख पाहुणे प्रा रवी सुरवसे म्हणाले की, नीट सारख्या अतिशय महत्त्वाच्या परीक्षेमध्ये पैसे घेऊन मॅनेज होऊन रातोरात मॉडेल उत्तर पत्रिका घरपोहोच होत आहेत. हा प्रकार शैक्षणिक क्षेत्रात अतिशय भयंकर असून पत्रकारांनी या बाजू मांडणे आवश्यक आहेच. तसेच यामध्ये गोरगरिबांची मुले कुठे आहेत ? याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अमजद सय्यद यांनी तर सूत्रसंचालन जिल्हा संघटक कुंदन शिंदे यांनी व उपस्थितांचे आभार पांडुरंग मते यांनी मानले. 


या विद्यार्थी व पालकांचा झाला सन्मान 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेख फरहान रिझवान अहेमद, गौरी संतराम गाढवे, शिवम पांडुरंग मते, कैफ इस्माईल पटेल, सुप्रिया सुभाष कदम, भक्ती उमरावसिंग बायस, विशाखा हरिश्चंद्र धावारे, तमन्ना मुस्तफा पठाण, शेख तब्बसूम अब्दुल रहीम, सानिया रियाज शेख, दिग्विजय राजेंद्र जाधव व दर्शन राजकुमार गंगावणे या विद्यार्थ्यांसह पालकांना प्रशस्ती पत्र, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मानित करण्यात आले.

 
Top