कळंब (प्रतिनिधी)- विविध सामाजीक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीने या वर्षीचा कळंब भूषण पुरस्कार श्रीयुत दिनेश वाघमारे यांना जाहिर केला आहे . पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असुन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.

अध्यक्ष रो. रवी नारकर व सचिव रो. डॉ. साजेद चाऊस यांचा कार्यकाल संपल्याने 2024-2025 या कालावधी साठी अध्यक्ष रो.अरविंद शिदे सचिव रो.अशोक उर्फ पापा काटे हे पद संपादन करतील. 21 जुलै रोजी हा पदग्रहण समारंभात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून सुप्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दिक्षीत उपस्थित राहणार आहेत.

कळंब भूषण पुरस्कार जाहीर झालेले श्रीयुत दिनेश वाघमारे हे विद्याभवन हायस्कुलचे माजी विद्यार्थी असुन ते मुळचे भाटशिरपुरा येथील रहिवाशी आहेत. पॉलीटेक्नीक डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर काही वर्षे त्यांनी कंपनीत नोकरी केली. 2004 साली त्यांनी स्वतःची  या नावाने कंपनी स्थापण करून अग्निशमन वाहने तसेच ईतर खास उपयोगी वाहान उत्पादन युनीट सुरु केले. त्यांची उत्पादने जगभरातील विविध देशात निर्यात केली जात आहेत . कोरोना काळामधे त्यांनी ऑक्सीजन कॉन्सट्रेटर पुरविण्याचे सामाजीक कार्य केले आहे. उत्पादन युनीटच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कठीन परिस्तिथीशी संघर्ष करून मेहनतीने व जिद्दीने त्यांनी उद्योग विश्वात भरारी घेऊन कळंबचे नाव उज्वल केले आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास व पदग्रहण कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

 
Top