धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील शिवशंभू पंढरी वसाहतीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विकासार्थ विद्यार्थी (एसएफडी) धाराशिव यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धाराशिव येथे विविध 11 वृक्षांचे “वृक्षारोपण“ करण्यात आले. 

यावेळी लातूर विभाग संघटनमंत्री अजित केंद्रे, जिल्हा संयोजक तेजसिंह कोळगे, शहरमंत्री वैष्णवी थिटे, शहर सहमंत्री अनिकेत कोळगे,  संयोजक सत्यहरी सुदर्शना शेषनाथ वाघ , शुभम कोळगे, सार्थकी सुदर्शना शेषनाथ वाघ, जेष्ठ नागरिक प्रा. श्यामराव दहिटणकर, निवृत्ती बँक कर्मचारी चव्हाण, सौ. धत्तुरे, सागर धत्तुरे, अर्जुन सोमवंशी, पोलिस एकनाथ पुंडकर  उपस्थित होते. वसाहतीतील नागरिकांनी वृक्षारोपण केलेल्या वृक्षांच्या सुरक्षा व संगोपनाची जवाबदारी घेतली आहे.

 
Top