धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील राष्ट्रीय महामार्ग तुळजापूर मार्गावर असलेल्या ग्रीन लॅन्ड सीबीएसई स्कूल येथे देवगिरी प्रांत संस्कार भारती समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 8 व 9 जून 2024 रोजी संपन्न होणार आहे. या सभेच्या उद्घाटन प्रसंगी धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, सोलापूर स्नेहालय प्रमुख  प्रदीपकुमार शिंगवी, जनता बँक अध्यक्ष वसंतराव नागदे ,राष्ट्रीय पदाधिकारी रवींद्र बेडेकर, पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे उपस्थिती असणार आहे.

त्याच बरोबर देवगिरी प्रांतध्यक्ष भारत लोळगे, महामंत्री डॉ. जगदीश देशमुख, मातृशक्ती प्रमुख स्नेहल पाठक, कार्याध्यक्ष भगवान देशमुख, मार्गदर्शक सुधीर कुलकर्णी, पं. दिपक लिंगे, प्रांत पदाधिकारी डॉ. सतिश महामुनी, शेषनाथ वाघ, डॉ. अरविंद देशमुख, उपस्थितीत राहणार आहेत. या सर्वसाधारण सभेसाठी प्रांतातील 13 जिल्हाच्या समितीतील पदाधिकारी सहभागी होणार आहेत या दोन दिवशीय सभेत सांस्कृतिक कार्यक्रम, पहाट संगीत सभा, निवडणूक, हिशोब, पुढील नियोजन, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी कार्यक्रम नियोजन, एकूण पाच सत्रात सभा संपन्न होणार आहे. असे आयोजक जिल्हा धाराशिव संस्कार समिती जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, कार्याध्यक्ष अनिल ढगे, सचिव प्रभाकर चोराखळीकर, कोष प्रमुख अरविंद पाटील, सभा प्रमुख लक्ष्मीकांत सुलाखे,उपाध्यक्ष पद्माकर मोकाशे, दिपक महामुनी, शहर संयोजक शरद वडगावकर, प्रफुल्ल कुमार शेटे, जिल्हा पदाधिकारी सुरेश वाघमारे, रवींद्र कुलकर्णी, गणेश कसपटे, धनंजय जेवळीकर, संदीप रोकडे, सौ. गीता व्यास, धनंजय कुलकर्णी, सौ.वर्षा कुदळे, महादेव केसकर, सुशील कुलकर्णी यांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

 
Top