धाराशिव (प्रतिनिधी)-येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये 351 व्या शिवराज्यभिषेक सोहळा निमित्त प्रशालेत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन संस्थाध्यक्ष सुधीर पाटील यांनी केले. तर प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी शिवराज्यभिषेक सोहळ्याचे वर्णन आपल्या खास शैलीत करत तत्कालीन काळात या राज्यभिषेकाची का गरज होती, याचाही उलगडा आपल्या छोट्या खानी भाषणात त्यांनी केला.

 यावेळी युवा नेते कुणाल निंबाळकर, डॉ. सुभाष वाघ सह संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख, उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक धनंजय देशमुख, संदीप जगताप, प्रा. नासीर मोमीन, कलाशिक्षक शिवाजी भोसले, गणेश गोरे व अनेक गणमान्य यावेळी उपस्थित होते.

 
Top