तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर परिसरातील बहुंताशी  सार्वजनिक शौचालये अस्वच्छतेच्या विळख्यात अडकले आहेत. दररोज स्वच्छता केली जात नाही. तेथेच कचरा साचला असून, तो कुजल्यामुळे उग्र वासाने परिसरात दुर्गंधीमुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था झाली आहे. स्वच्छता ठेकेदाराने शौचालय स्वच्छ केले नसल्याने त्याचे स्वच्छतेचे पन्नास टक्के बिल अदा करु नये अशी मागणी शहरवासियांमधुन केली जात आहे.

स्ञीशक्ती देवता नगरीत महिला स्वच्छतागृहांची संख्या  अत्यल्प आहे. भाविक संख्या वाढली पण स्वछतागृह संख्या वाढण्या ऐवजी घटली आहे. त्यामुळे तिर्थक्षेत्री महिला वर्गाची कुंचबना होत आहे. सार्वजनिक शौचालये नागरिकांच्या आरोग्यासाठी उभारली आहेत. मात्र,दररोज स्वच्छता केली जात नसल्यामुळे

आरोग्यास धोका वाढला आहे. सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी असलेल्या टाक्या फुटल्या आहेत. काही गळत आहेत. काही ठिकाणी टाक्यांना पाणीपुरवठा करणारे पाइप, नळ तुटले आहेत. रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था नसल्याने मद्यपी या ठिकाणी बिनदिक्कत मद्यप्राशन करून बाटल्या तेथेच टाकतात. त्यामुळे रिकाम्या बाटल्या फुटून दुखापत होण्याचा धोका वाढला आहे. मात्र, त्याची स्वच्छता केली जात नसल्याने नागरिकांना ये-जा करताना उग्र वासाचा त्रास होत आहे. महिलांची सोय केली असली तरी ती गैरसोय झाली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या दुरावस्थेमुळे येथे तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा लागत आहे.

 
Top