तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या समग्र शिक्षा मोफत पाठ्यपुस्तक योजना या उपक्रमांतर्गत मराठी माध्यम  सेमी माध्यम उर्दू माध्यमाच्या   विद्यार्थ्यांना होणार पुस्तक संचाचे वाटप केले जाणार आहे.अशाप्रकारे तालुक्यातील  इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या 25867 विद्यार्थ्यांना 1 लाख 3 हजार 468 पुस्तकसंचाचे वाटप करण्यात येणार आहे. 

पुणे स्थित 'बालभारती' येथून प्रथमतः तालुका पातळीवर पाठ्यपुस्तके पुरवठा करण्यात येत आहेत. तालुका पातळीवरून ती पुस्तके केंद्र पातळीवर व केंद्र पातळीवरून शाळा पातळीवर पोहोच करण्यात येणार आहेत. तालुका स्तरावरुन केंद्र स्तरावर पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशीच म्हणजे 15 जून 2024 रोजी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तकाचे देण्याचे नियोजन आखण्यात आले.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवी जिल्हा परिषद नगरपरिषद व खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके वितरित केली जाणार आहेत. जिल्हा परिषद 200 शाळा, नगरपरिषद 02 शाळा व खाजगी अनुदानित 78 शाळांचा समावेश आहे. विध्यार्थींसंख्या कंसात पुस्तक संख्या. तिन्ही माध्यमांचे पहिलीचे विद्यार्थी 2134(8536), दुसरी 2490(9960),तिसरी 3275(13100), चौय्थी 3896(15580),पाचवी 3382(13528), सहावी 3365(13460), सातवी 3640(14560), आठवी 3386(14744)ऐकुण 25857 विध्यार्थांना 103468पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. यात मराठी माध्यमांची सर्वाधिक पुस्तके असुन नंतर सेमी माध्यम नंतर उर्दू माध्यमांचा समावेश आहे.

 
Top