तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी शनिवार दि15 रोजी  नवगतांचे स्वागत दिंडी काढुन पायांचे ठसे सह अनेक उपक्रम घेऊन स्वागत करण्यात आले.  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळगा मेसाई येथे प्रवेश दिंडी, नवगतांचे स्वागत व पाठ्यपुस्तक वाटप शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले विविध शाळांना विस्तार अधिकारी मलीनाथ काळे विस्तारधिकारी: शाळेच्या पहिल्याच दिवशी आकस्मिक भेट दिली.

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा काक्रंबा येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी परिपाठाच्या वेळी जिल्हा परिषद धाराशिव येथील विस्तार अधिकारी सांगळे, जंगम बालाजी एरमुडवार, भारत देवगुंडे व काक्रंबा बीटचे विस्तार अधिकारी मल्लिनाथ काळेयांनी शाळेला अचानक भेट दिली. यावेळी नवागतांचे गुलाबाचे पुष्प देऊन स्वागत केले आणि विद्यार्थ्यांशी ओळख करून विद्यार्थ्यांना, शिक्षकांना प्रेरित केले.पहिल्याच दिवशी परिपाठ न चुकता राष्ट्रगीत, राज्य गीत, संविधान, प्रार्थना विद्यार्थ्यांनी सादर केल्याचे पाहून शाळेचे अभिनंदन केले.  यावेळी इयत्ता पहिलीतील नवागतांचे स्वागत गुलाबाचे पुष्प देऊन करण्यात आली तसेच पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी  दप्तर विना शाळा या उपक्रमासाठी 50 पुस्तके ग्रंथालयासाठी भेट देण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका उषा उंबरे व शिक्षक वृंद माया पवार, वर्षा पाठक ,जयश्री चव्हाण, दिपाली परदेशी ,मीनाक्षी शिंगडे संजीवनी सरवदे, वैशाली खोडवे, अश्विनी जोगदंड , उमेश सुर्वे अनिल दहीहांडे,जगन्नाथ वाघे, छगन जगदाळे ,अनुराधा क्षीरसागर सेविका उपस्थित होते.


जिल्हा परिषद शाळेला साऊंड सिस्टिमची भेट

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा काक्रंबा येथे आज शाळेच्या पहिल्याच दिवशी तुळजापूर येथील स्त्री रोग तज्ञ डॉक्टर किरण प्रवीण रोचकरी यांच्याकडून कैलासवासी डॉक्टर प्रवीण रोचकरी यांच्या जयंतीनिमित्त अहुजा कंपनी साऊंड सिस्टिम शाळेला भेट देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य निशिगंधा पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर किरण रोचकरी, अशोक देवगुंडे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश पाटील, शहाजी ननावरे नीलकंठ मोरे ,श्याम ढेरे, गोविंद साठे, रणजीत मोरे, श्रीमंत घोगरे, महादेव साठे बाबा शिरसागर ,पांडुरंग साठे, उमेश पांडागळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या कोमल मेहत्रे, दमयंती पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका उषा उंबरे आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.

 
Top