तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील काक्रंबा येथील शिवारातील श्री राजे लॉज वरती गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मारला. स्वतःच्या फायद्यासाठी महिलेंना वेश्याव्यवसाय करता प्रवृत्त करून वेशा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आपली उपजीविका भागवत असल्याचे दिसून आल्यानंतर छापा मारून दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा  शिवारातील श्री लॉज येथे दिनांक 14 जून रोजी दुपारी 5.15 वाजण्याच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे छापा मारला. आरोपी हे संगणमत्ताने ते चालवत असलेल्या लॉज मध्ये गिऱ्हाईकास त्यांच्या मागणीप्रमाणे समागमासाठी पीडित महिलेला आपल्या लॉजवर बोलून घेऊन ग्राहकाकडून प्रत्येकी 1500 रुपये घेऊन त्यापैकी प्रत्येक ग्राहकांच्या मागे दोघांसाठी 800 कमिशन घेऊन पीडित महिलेस 700 रुपये देऊन त्यांना समागमाकरिता भाग पाडून वेश्या व्यवसायासाठी आपल्या लॉज मधील खोल्या उपलब्ध करून देऊन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना वेश्याव्यवसाय करता प्रवृत्त करून वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपली उपजीविका करत असताना मिळून आले.

अशा प्रकारची फिर्याद अमोल रमेश निंबाळकर वय 45 वर्ष स्थानिक गुन्हा शाखा धाराशिव यांनी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरून पोलिस स्टेशन तुळजापूर येथे गुन्हा नोंद झाला आहे. 

 
Top