तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा सुपरवारीयर मराठवाडा सहसमन्वयक ॲड. अनिल काळे यांनी त्यांच्याशी धाराशिव जिल्ह्यातील वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक करण्यासंदर्भात चर्चा केली. त्यांनी याबाबत आपण समिती नेमून तत्काळ अहवाल मागवत आहोत. तो अहवाल आल्यानंतर त्याबाबत आपण सकारात्मक निर्णय घेणार असल्याबाबत आश्वस्त केले. त्यांनी प्रवीण परदेशी व ॲड. अनिल काळे व इतर सहकाऱ्यांसोबत बैठक झाली असल्याबाबत आठवण केली.

राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवार दि. 3 जून रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरला येवुन श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. देशात राज्यात भाजप खासदार मोठ्या संखेने निवडून येवू दे असे साकडे घातले. यावेळी भाजप शहराध्यक्ष शांताराम पेंदे, कार्यकारणी सदस्य अनिल काळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील, विकास मलबा, महादेव रोचकरी उपस्थितीत होते.

 
Top