तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले सावरगाव येथील श्री नागनाथ देवस्थान परिसरात सोमवार (दि.3)रोजी 155 वृक्षांची लागवड करण्यात आली. जागृत देवस्थान नागनाथ महाराज मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी येथील सुपुत्र पुणे स्थित उद्योजक निवृत्ती आबा वायकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत देवस्थानचा परिसर नयनरम्य व्हावा या उदांत हेतूने  विविध प्रकारचे 155 वृक्ष भेट दिले आहेत. यामध्ये चिंच, जांभूळ, वड पिंपळ, अशोका, गणेश, मोगरा, सप्तपर्णी यासह विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. 

लागवड केलेली वृक्ष जोपासण्यासाठी  ठिंबकच्या माध्यमातून पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. नागनाथ मंदिर परिसरात वृक्ष लागवड व्हावी, परिसर वृक्षांनी बहरावा अशी भाविकांची तीव्र इच्छा होती. देवस्थान परिसरात वृक्ष लागवड झाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे. वृक्ष लागवडीसाठी रामराजे पाटील, सुरेश रुपनर, संजय रुपनर, बालाजी फंड, प्रा. कानिफनाथ माळी, चंद्रकांत गाभणे, चंद्रकांत भालेकर, दादासाहेब काडगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

 
Top