धाराशिव (प्रतिनिधी)-विविध वृत्त वाहिण्यावर  एक्झिट पोल  सांगितल्यानंतर धाराशिव मतदारसंघात ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे निकालापूर्वीच धाराशिव शहर व इतर काही ठिकाणी ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहेत.

निकालापूर्वीच शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचे धाराशिव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनर लागले आहेत. दुसऱ्यांदा खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असे भले मोठे बॅनर कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी लावले आहे. यापूर्वी काल धाराशिव तालुक्यातील जागजी येथे बॅनर लागले होते. गुलालाची उधळण करीत पेढे वाटून शिवसैनिक आजपासूनच आनंद उत्सव साजरा करीत आहेत. सोमनाथ गुरव, रवी वाघमारे, पंकज पाटील, अमित उंबरे यांच्यासह पदाधिकारी यांनी जल्लोष केला. 

 
Top