धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्पनेचा वारसा जोपासत रयतेचे राज्य निर्माण करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 150 वी जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) जिल्हा कार्यालय धाराशिव येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

थोर समाजसुधारक, लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला, विचारांना आणि स्मृतींना कृतज्ञतापूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे पदाधिकारी यांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. देशभरातील संस्थांनिकांमध्ये समाजसुधारणेबाबत आग्रही भूमिका त्या काळात शाहू महाराजांनी घेतली. शिक्षणाची सक्ती केली. आरक्षणाची सुरूवात केली. अशा क्रांतीकारी निर्णय घेणाऱ्या या राजाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थित मान्यवर यांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष समियोद्दीन मशायक,प्रदेश संघटक सचिव खलील पठाण,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप,आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण,सेवा दल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव,महीला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण,धाराशिव युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे,विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने,धाराशिव महिला तालुका कार्याध्यक्ष रुक्मिणी कुंभार,धाराशिव तालुका उपाध्यक्ष विराट पाटील,धाराशिव तालुका सरचिटणीस प्रकाश बालकुंदे,धाराशिव महिला शहराध्यक्ष सुलोचना जाधव,कामगार सेल धाराशिव शहराध्यक्ष प्रमोद हावळे,अल्पसंख्याक शहराध्यक्ष अरफात काझी,धाराशिव महिला तालुका उपाध्यक्ष उषा लगाडे,धाराशिव अल्पसंख्यांक महिला शहर कार्याध्यक्ष अमिना शेख,धाराशिव अल्पसंख्यांक महिला शहर उपाध्यक्ष सना शेख,केशेगाव जि.प.गटप्रमुख लिंबराज लोखंडे,आंबेजवळगा जि.प.गटप्रमुख सुरेश राठोड,बेंबळी शहराध्यक्ष अतिष मरगणे,चंद्रकांत लोमटे,मुख्तार शेख,मुख्तार हुसैन,यासेर सय्यद,आदि पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी उपस्थित होते.

 
Top