धाराशिव (प्रतिनिधी)- काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सरडे, तालुकाध्यक्ष रोहित पडवळ यांच्यासह धाराशिव तालुक्यातील काँग्रेसच्या असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन व आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत धाराशिव तालुक्यातील अनेक पदाधिकारी, विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, सदस्य व असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. काँग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सरडे, तालुकाध्यक्ष रोहित पडवळ, काजळाचे माजी पंचायत समितीचे सदस्यआश्रुबा माळी, समुद्रवाणी येथील अशोक शिंदे, बलभीम जाधव, दारफळ येथील सरपंच रवींद्र जाधव, वरुडाचे सरपंच खंडेराव गाढवे, केशेगावचे सरपंच अभिजित पाटील, देवळालीचेसंतोष गायकवाड, मेडसिंगाचे उपसरपंच किशोर आगळे, आंबेडकर साखर कारखान्याचे संचालक सुग्रीव कांबळे, पाटोदाचे युवराज परतापुरे, कौडगावचे (बावी) आकाश कदम, तेर येथील शिवाजी चौगुले, महाळंगीचे बालाजी ढवळे, नांदुर्गाचे अंगद पवार, यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. भाजपा कार्यालय, प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे संपन्न झाला. यावेळी सुनील चव्हाण, ज्येष्ठ नेते सुरेश देशमुख, माजी नगराध्यक्ष मधुकरराव तावडे, माजी नगराध्यक्ष संपतराव डोके, युवराज नळे, दर्शन कोळगे, प्रल्हाद धत्तुरे, पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


 
Top