धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले विद्यालयात  महाराष्ट्र व कामगार दिन तसेच गुरुवर्य के.टी. पाटील प्रज्ञा शोध परीक्षा घेण्यात आलेल्या बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न. प्रथम 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण नुतन प्राचार्य तथा मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

त्यानंतर स्व. गुरुवर्य के.टी. पाटील सर प्रज्ञाशोध परीक्षा श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या इ. 7 वी विभागात घेण्यात आलेल्या सहभागी एकूण 50 विद्यार्थ्या पैकी प्रथम क्रमांक अविष्कार हुलसुरकर द्वितीय प्रतिक शिंदे तृतीय शुभम गंधुरे यास संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, संस्था सदस्य जेष्ठ शिक्षक फुलचंद गाडे, संस्था सदस्य माजी अधिक्षक के. के. जाधव, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त वाय.के. पठाण, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, माजी मुख्याध्यापक साहेबराव देशमुख, माजी उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी, नुतन मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपाचार्य संतोष घार्गे, नुतन उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, इयत्ता 7 वीचे पर्यवेक्षक राजेंद्र जाधव यांचे हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर मार्गदर्शक शिक्षक एस.डी.पडवळ, के. एच. लामतुरे, एस.एच. शेख, शिक्षिका कु. कविता एस.भोसले यांचाही सत्कार करण्यात आला. या समारंभास सर्व पर्यवेक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते.  त्यानंतर शैक्षणिक वर्ष 2023 - 2024 चे निकाल पत्रक वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुर्यकांत पाटील यांनी केले. तर आभार नुतन उपमुख्याध्यापक प्रमोद कदम यांनी मानले.


 
Top