परंडा (प्रतिनिधी) - तालुक्यातील भोंजा हवेली येथे कृषी विभाग जिल्हा कृषी अधिक्षक धाराशिव व तालुका कृषी अधिकारी परंडा यांच्या नियोजनबद्ध खरीप हंगाम पुर्व तयारीसाठी पिक प्रात्यक्षिक करून शेंद्रीय शेती करण्याचे आवाहन कृषी सहायक विनोद भाग्यवंत यांनी शेतकऱ्यांना केले.

बि बियाण्यांचे प्रात्यक्षिक गोणपाट वरती दहा लाईन उभ्या आडव्या करून शंभर बियाणे ठेवावे. यामधील 70 टक्के बियाणे उगवण क्षमता आल्यावर शेतकऱ्यांनी सरासरी 25 ते 30 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. तसेच रासायनिक शेतीकडे शेती करण्यासाठी मागील हंगामात पाटपाण्याने ऊस लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. परंतु सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना शेतीचा ताळमेळ बसत नसल्याने त्यातच दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी यावर्षी शेतकऱ्यांनी शेंद्रीय शेती करण्याचे ध्येय बाळगावे व येणाऱ्या पिढीला चांगली प्रेरणा मिळावी आणि चांगल्या पालेभाज्या कडधान्य दुग्धजन्य पदार्थांची चव चाकता यावी. यासाठी चालू पिढी ने सकारात्मकता दाखवली पाहिजे असे कृषी सहायक विनोद भाग्यवंत यांनी सांगितले. तसेच लघुउद्योग सल्लागार  पाटील बुवा जि. प. प्रोडुसर कंपनी लि.भोंजा हवेली चे डायरेक्टर गणेश नेटके यांनी शेंद्रीय शेती करण्यासाठी निंबोळी अर्क चे महत्व पटवून दिले. या मे महिन्याच्या शेवटच्या चालू आठवड्यापासून ते जून दोन आठवड्यापर्यंतच्या लिंबाच्या झाडाखाली मोठ्या प्रमाणावर लिंबोळ्या पडलेल्या असतात. या लिंबोळ्या वेचून याचे निंबोळी अर्क बनवून फवारणी करण्यासाठी याचा उपयोग होतो. महत्वाचे चार किटकनाशके पिकावरील नष्ट होतात. तर निंबोळी पावडर हे शेतीसाठी शेंद्रीय कार्बन उपयुक्त आहे. यामुळे उत्पादनात वाढ होण्यासाठी मदत होते. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून माहिती घेतली. यावेळी उपसरपंच वस्ताद शिवाजी घाडगे, सर्जेराव मोरे, शिवाजी नेटके, बाबासाहेब मोरे, नवनाथ नेटके, बिरमल कोंडलकर, अशोक नेटके, हनुमंत काशीद, देविदास सरवदे, लव्हु जाधव, गणपती कोंडलकर, त्रिंबक मोरे, लव्हू मोरे, गोपाळ जाधव, अमोल नेटके, प्रविण नेटके, निखिल मोरे, परमेश्वर भांदुर्गे, भाऊ नेटके, गोपीनाथ कांबळे, शुभाष जाधव, रेवन काशीद आदि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

 
Top