भूम (प्रतिनिधी)- परंडा भूम वाशी मतदार संघामधील शेतकऱ्यांना सोयाबीन पिक विम्याची उर्वरित 75% रक्कम पेरणी आगोदर शेतकऱ्यांच्या  खात्यावर वर्ग  करण्यात यावेत अशी मागणी  महाविकास आघाडी भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात उपविभागिय अधिकारी वैशाली पाटील भूम यांना निवेदन देण्यात आले आहे.

प्रशासनास दिलेल्या निवेदनावर असे म्हटले आहे कि, परंडा भूम वाशी मतदार संघामध्ये मागील खरीप हंगामात पावसात प्रचंड प्रमाणावर खंड पडला होता. शेतक-यांनी पिक विमा भरून संरक्षीत केलेल्या सोयाबीन सहीत सर्व खरीप पिकाचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले होते. या परीस्थितीमुळे शेतक-यांना 25% अग्रीम पिक विमा मिळावा यासाठी  विविध राजकीय, अराजकीय संघटनांनी मागणी केली होती आणि शासन निर्णयातील तरतुदी नुसार शेतक-यांना 25% अग्रीम विमा नुकसान भरपाई मिळाली होती. परंतु मोठ्या प्रमाणावर पडलेला पावसाचा खंड, दुष्काळ यामुळे मतदार संघातील शेतक-याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले म्हणून त्यांना उर्वरीत 75% नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विलास शाळू, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष हनुमंत पाटोळे, रुपेश शेंडगे, ॲड श्रीनिवास जाधवर, दिलीप शाळू महाराज, मोईज सय्यद शेखापूरकर, प्रल्हाद अडागळे, विनोद नाईकवाडी, गणेश साठे, रमेश मस्कर, आबासाहेब मस्कर, श्रीराम खंडागळे, दिपकमुळे ,काँग्रेसचे महादेव जाधव असलम पठाण, भरत खरात आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top