तुळजापूर (प्रतिनिधी)- उन्हासुट्या लग्नसराई तसेच देविचा मंगळवार, बुधवार, मंदीर पोर्णिमा, गुरुवार वैशाखी पोर्णिमासुट्टी व शुक्रवार देविचा वार पार्श्वभूमीवर चार दिवस तिर्थक्षेञ तुळजापूर भाविकांनी गजबजुन गेले होते. चार दिवसात पाच लाख भाविकांनी श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.

मंगळवार पहाटे पासुन मंदीरातील श्रीकल्लोळ श्रीगोमुख तिर्थकुंडात स्नान करुन मगच श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ  जात पहाटे अर्धा तासात दर्शन होत होते. सकाळी  माञ दोन ते तीस लागत भाविकांना दर्शनार्थ लागत होते. पाचशे दोनशे रुपये सशुल्क दर्शनार्थ  लांबच्या लांब रांगा लागत होत्या. यंदा दुष्काळ परिस्थिती असताना भाविकांनी उन्हाळ्यात दररोज देवीदर्शनार्थ प्रचंड गर्दी करीत होते.

 यात गुरुवार वगळता रोज पहाटे एक वाजता मंदीर दर्शनार्थ खुले केले  जात होते. पहाटे पासुन भाविक उन्हातान्हाची पर्वा न करता श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ गर्दी करीत होते. यंदा भाविकांच्या संखेत मोठीवाढ दिसुन आल्या ने मुलभुत सुविधा पुरवताना नगरपरिषद  वर प्रचंड ताण पडल्याचे दिसुन आले. संपूर्ण ऊन्हाळ्यात वाहतुकीची नियोजन कोलमडल्याचे दिसुन आले.

 
Top