तुळजापूर  (प्रतिनिधी) -यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूरचा फेब्रुवारी 2024 बारावी परिक्षा शाखा निहाय निकाल समाधानकारक लागला असुन विज्ञान शाखा  94.59%, कला शाखा 65.97 %, वाणिज्य शाखा 91.17% असा  आहे.

महाविद्यालयातून विज्ञान शाखा प्रथम क्रमांक प्राजक्ता श्रीनंद गायकवाड, 81.17 टक्के, द्वितीय क्रमांक  श्रद्धा संजय  जाधव 78.31%, तृतीय क्रमांक  सानिया अजीज  आता 71.67%,  कला शाखा प्रथम क्रमांक  पंकज लक्ष्मण  गुरव 85.17%, द्वितीय क्रमांक  सुषमा तानाजी  साखरे 70.83%, तृतीय क्रमांक  कीर्तन सुभाष खंडागळे  66. 00%, वाणिज्य शाखा प्रथम क्रमांक ज्ञानेश्वरी प्रसाद  खामकर 85.50%, द्वितीय क्रमांक गाटे श्रद्धा धनंजय 81.67%, तृतीय क्रमांक  संयोगी उदय आलूरकर  77.17%, एमसीव्हीसी शाखाप्रथम क्रमांक  सातलिंग सदाशिव खोबरे 70 टक्के,  द्वितीय क्रमांक अनिकेत ज्ञानेश्वर पवार 62.33% , तृतीय क्रमांक  हनुमंत राजेंद्र कुंभार  61.50% असे गुण अनुक्रमे विद्यार्थी आहेत. बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, संस्थापक सचिव नरेंद्र बोरगावकर,  संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर, कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे, संचालक बाबुराव चव्हाण, प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड, उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, कनिष्ठ विभाग उपप्राचार्य प्रा रमेश नन्नवरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

 
Top