परंडा (प्रतिनिधी) - मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील मराठा ओबीसी आरक्षण मागणीसाठी पुन्हा अंतरवली सराटी येथे दि.4 जून पासून आमरण उपोषण सुरू करीत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जनजागरण गाव बैठका घेण्यात येत आहेत. या अनुषंगाने परंडा तालुक्यातील 9 गाव बैठका घेण्यात आल्या व 4 जून रोजी अंतरवली सराटी येथे मोठयासंख्येने मराठा बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.

जरांगे पाटील प्रकृती खराब असताना ते मराठा समाजाच्या लेकरांना आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करत असतील तर आपले देखील कर्तव्य बनते आपण त्यांना पाठिंबा देण्यासाठी अंतरवली सराटी येथे खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा देण्याची गावा गावातून सर्व मराठा समाज बांधवानी एकत्रित येवून अंतरवली सराटी येथे जाण्याची तयारी करावी. या करिता आपण जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी जागृती करावी असे आवाहन सकल मराठा समाज भूम, परंडा, वाशी यांच्या वतीने करण्यात आले आहे. शनिवार दि. 25 रोजी परंडा तालुक्यातील आनाळा, इनगोदा, वाटेफळ,  शेळगाव, तांदुळवाडी, देऊळगाव, डोंजा, मुगाव, कार्ला व सोनारी या 9 गावात बैठक घेण्यात आली.

 
Top