धाराशिव (प्रतिनिधी) -येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख बोलत होते. रामकृष्ण परमहंस महाविद्यालय हे तळागाळातील विद्यार्थ्यापर्यंत सर्व शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. हे महाविद्यालय बहुजनांच्या शिक्षणाचे महाद्वार आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

ते पुढे म्हणाले की,महाविद्यालयात बहुजनांच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाविद्यालयात अनेक विषयांचे पीएच.डी.चे संशोधन केंद्र आहेत.शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या कृपाशीर्वादाने ही शिक्षणाची संधी मराठवाड्यातील बहुजनांच्या मुलांना मिळत आहे. सदर कार्यक्रम  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख हे होते. यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. केशव क्षीरसागर यांनी केले तर आभार डॉ. साखरे यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असणारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top