धाराशिव (प्रतिनिधी) -राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या धाराशिव जिल्हा कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त बुधवारी (दि.1) जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाराष्ट कामगार दिनानिमित्त बांधकाम कामगार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, मुस्ताक कुरेशी, बालाजी डोंगे, इकबाल पटेल, अनिल जाधव, डॉ. ताडेकर, रमेश हजारे यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते.


 
Top