धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील भंडारवाडी येथील शिवारात गुरुवारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे येथील शेतकरी केशव किसनराव जाधव यांच्या गट नंबर 70 या शेतातील विजेसाठी लावलेल्या सौर ऊर्जेचे पॅनल उन्मळूनपडले. त्याशिवाय कडब्याची गंज व जनावरांसाठी बांधलेले पत्र्याचे शेड उडून गेले. तसेच या परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे ग्रामस्थांची शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 
Top