भूम (प्रतिनिधी)-शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय भूम येथे बारावी बोर्ड परीक्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्था आणि कॉलेजच्या वतीने पालकासह सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डी. डी. बोराडे,संस्था सचिव एम.काटे, उपसचिव तथा प्राचार्य एस. एस.शिंदे तसेच संस्थेचे पदाधिकारी उत्तम बोराडे आणि सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच प्राचार्य संतोष शिंदे सर यांनी फेब्रुवारी 2024 उच्च माध्यमिक परीक्षा निकालाचे वाचन केले. विज्ञान शाखा- 91.71 टक्के, वाणिज्य शाखा 76.19%, कला शाखा 63.06%, एकूण प्रविष्ट विद्यार्थी 331 उत्तीर्ण 262. एकूण निकाल 79.15%, विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे- विज्ञान शाखा 

प्रथम क्रमांक शेख अहमद लालू 79%, द्वितीय क्रमांक कुमारी डोंबाळे साक्षी तुकाराम 71.67%, तृतीय क्रमांक कुमारी पाठमास अश्विनी रामेश्वर 70.50%. वाणिज्य शाखा- प्रथम क्रमांक कुमारी आसलकर अनुष्का संदीप 79.17%, द्वितीय क्रमांक कुमारी तांबे प्रतीक्षा परमेश्वर 69.17%, तृतीय क्रमांक लोंढे चैतन्य सुनील 69 %. कला शाखा- प्रथम क्रमांक नागटिळक औदुंबर अरुण 77%, द्वितीय क्रमांक कुमारी मुंडेकर सोनाली बाळासाहेब 74.50%, तृतीय क्रमांक कुमारी खटाळ राणी मोहन 72.50%. यशस्वी विद्यार्थीनी स्वतःचे मनोगत व्यक्त केले. तसेच पालकांनीही कॉलेजच्या यशस्वी कार्यबद्दल समाधान व्यक्त करून आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गंगाधर काळे, आभार प्रा. सोळंके यांनी मानले.

 
Top