तुळजापूर (प्रतिनिधी) - प्लॉट खरेदी करण्यासाठी कर्ज काढून सदर प्लॉटची रजिस्ट्री सोमवारी असल्यामुळे बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या 48 वर्षीय व्यक्तीला दिवसाढवळ्या सहा लाख रुपयाचा गंडा लावल्याची घटना दिनांक 24 मे रोजी दुपारी साडेतीन ते पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीनुसार तुळजापूर फिर्यादी पंचायत समितीमध्ये क्लार्क म्हणून कार्यरत असलेली तात्यासाहेब महादेव राठोड वय 48 वर्ष रा. कावलदारा हे दिनांक 24 मे रोजी दुपारी साडेतीन ते पावणेचार वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया येथे बँक लोन काढून प्लॉट खरेदी करण्यासाठी सोमवारी रजिस्ट्री असल्यामुळे शुक्रवारी दुपारी बँकेत गेले होती. सदर रक्कम चेकने सहा लाख रुपये काढली. बँकेतून बाहेर येऊन त्यांच्या मोटरसायकल क्रमांक एमएच 25 एसी 9095 या मोटरसायकलच्या दिग्गी मध्ये पाचशे रुपये दराच्या 100 नोटा व दोनशे रुपये दराच्या 500 नोटा तसेच पासबुक वर चेक बुक असे एकूण सहा लाख रुपये कॅश ठेवली. फिर्यादीच्या ऑफिस मधील पवार व श्रीनामे यांना फिर्यादीला चहा पिण्यासाठी आवाज दिल्याने फिर्यादी हे त्यांच्या जवळच जाऊन चहा घेत होते. त्यावेळेस संधीचा फायदा सादर अज्ञात एका चोरट्याने मोटरसायकलच्या डिग्गीमध्ये ठेवलेली सहा लाख रुपये कॅश चेक बुक व पासबुक दिवसाढवळ्या चोरून घेऊन पसार झाला. 

अशा प्रकारची फिर्याद तात्यासाहेब राठोड वय 48 वर्ष रा. कावलदारा जि. धाराशिव यांनी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 232/2024 भादवि कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव हे करत आहेत.

तत्काळ सदर ठिकाणचे सीसीटीव्ही चेक केले असता सदर ठिकाणी एक संशयित आरोपी दिवसाढवळ्या सहा लाख रुपये कॅश घेऊन पसार झाला असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी  स्थानिक गुन्हा शाखेचे व तुळजापूर पोलीस स्टेशनची पथक आरोपीचा शोध घेत आहे.

यापूर्वीही रजिस्ट्री करण्यासाठी आलेल्या नळदुर्ग येथील युवकाची दिवसाढवळ्या नगरपरिषद समोरून हातातील बॅग घेऊन जाऊन सहा लाख रुपये घेऊन चोरटे पसार झाले होते. त्यांचा शोध अध्यापही सुरू असून आता पुन्हा असाच गुन्हा घडल्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित चोरट्यांच्या मुस्क्या आवळण्याची मागणी होत आहे.


तीर्थक्षेत्र तुळजापूर असल्यामुळे सातत्याने लहान मोठ्या चोऱ्याचे प्रमाण होत असते. त्याचबरोबर अपुरा पोलीस कर्मचारी असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणावरून सहा लाख रुपये चोरीस जातात. दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या चोऱ्यांच्या मुस्क्या पोलीस प्रशासन आवळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला असल्याचे दिसून येत आहे.

 
Top