भूम (प्रतिनिधी)-डेलोनिक्स सोसाटीचे बारामती कॉलेज ऑफ फार्मसी, बऱ्हाणपूर येथील प्रा. श्रीकृष्ण बाबाहरी बावकर, यांना  मध्य प्रदेश येथील मानसरोवर ग्लोबल युनिव्हर्सिटी, भोपाळ यांच्या कडून औषधनिर्माणशास्त्रातील सर्वोच्च पदवी पीएचडी नुकतीच प्रदान करण्यात आली. या साठी त्यांना डॉ आदित्य नाथ पांडे व डॉ राजेंद्र निवृत्ती पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

डॉ. श्रीकृष्ण बावकर यांनी “ऍनालीटीकल मेथड डेव्हलोपमेंट अँड व्हॅलिडेशन ऑफ एम्पाग्लिफ्लोझिन, लीनाग्लीपटीन अँड ब्यगुयानाइड इन कंबाइंड डोसेज फॉर्म बाय क्रोमॅटोग्राफिक अँड स्पेक्टरोस्कोपिक मेथड“ या विषयावर शोध निबंध सादर केला होता. तसेच या विषयावर त्यांचे दोन शोध निबंध आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहेत. सुमारे 14 वर्षाच्या शैक्षणिक जीवनामध्ये त्यांनी  आत्तापर्यंत त्यांच्या नावावर 35 पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर  तसेच 50 पेक्षा जास्त पोस्टर प्रेसेंटेशन त्यांच्या नावावर आहेत. भविष्यात ही माझ्याकडून समाजोपयोगी संशोधन केले जाईन याची गवाही डॉ बावकर यांनी या वेळी दिली. डॉ बावकर हे  छत्रपातीं शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विध्यालय, वाशीचे माजी प्राचार्य स्व. बाबाहरी बावकर यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल समाजातील सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 
Top