भूम (प्रतिनिधी)- विहिरीचे काम करत असताना 32 वर्षीय मजुराचा दि 24 रोजी तालुक्यातील नवलगाव शिवारात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याच्या मृत्युने सर्वत्र हळहळ व्यव्त केली जात आहे.                              

याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक अर्जुन गायकवाड रा. नवलगाव वय 32 हा मजूर नवलगाव शिवारातील शेतामध्ये इतर मजुरासोबत विहिरीचे खोदकाम चालू असताना क्रेनच्या पाटीमधून खाली विहिरीमध्ये पडून गंभीर जखमी होऊन मयत झाला आहे .सदरील घटनेचा पंचनामा पोलीस प्रशासनाने केला आसुन  मयताचे शवविच्छेदन येथील ग्रामीण रुग्नालयात  करण्यात आले. रात्री उशिरा  मृतदेह नातेवाईक यांच्याकडे  सोपवण्यात आला. सदरील गुन्हा परंडा पोलीस स्टेशन हद्दीत असल्यामुळे तिकडे वर्ग करण्यात आल्याचे पोलिस प्रशासनाने सांगीतले त्याच्या पश्च्यात आई  एक भाउ भाउजय दोन बहिणी असा परिवार आहे.

 
Top