परंडा (प्रतिनिधी) - परंडा तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्यांने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थीक मदत करा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सामाजीक न्याय विभागाच्या वतीने तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील आठवडयात झालेल्या पाऊसाने व वादळी वाऱ्याने शहरासह तालूक्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा व शेती पीकांचे मोठया प्रमानात नुकसान झाले आहे.तसेच अनेक कुटूंबाच्या घरावरील पत्रे उडून घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाल्यामुळे अनेक कुटूंबाचा संसार उघड्यावर पडला आहे.

तसेच वादळी वाऱ्यांने तालुक्यात अनेक ठिकानी विद्युत पोल उखडून पडल्यामुळे अनेक गावाचा विद्यूत पूरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विद्यूत पुरवठा तात्काळ दुरुस्त करण्याचे संबधित विभागाला निर्देश द्यावेत. नुकसानग्रस्त कुटूंबाच्या घराचे व शेती पिकांचेे तात्काळ पंचनामे करून संबंधितांना आर्थीक मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरद पवार सामाजीक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहूल बनसोडे, जिल्हा सरचिटणीस घनशाम शिदे, युवक शहराध्यक्ष खय्युम तुटके, टाकळी ग्रामपंचायतीचे सरपंच कृष्णा चौधरी, गणी हावरे, रंगनाथ ओव्हाळ, ज्ञानेश्वर काळे, अमोल ओव्हाळ, अर्जून बनसोडे, ज्ञानेश्वर बनसोडे, राजकुमार गरड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top