धाराशिव (प्रतिनिधी)- सेवानिवृत्ती वेतन मंजुरी प्रस्ताव व पेन्शन विक्रीचे बिल प्रलंबित असल्याने सदरील बिलाची पडताळणी करून बिल ऑडिट टेबलला पाठवण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयातील( निवृत्ती वेतन शाखा) लेखा लिपिक अनंता सखाराम कानडे यांस तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना दि. 28 मे रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांनी रंगेहाथ अटक केली आहे.

याबाबत एसीबीकडून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार,तक्रारदार हे सेवानिवृत्त पोलीस हवालदार आहेत. तक्रारदार यांचे सेवा निवृत्ती वेतन मंजुरी प्रस्ताव व पेन्शन विक्रीचे बिल कोषागार कार्यालय धाराशिव येथे प्रलंबित आहे. सदर बिलाची पडताळणी करून सदरचे बिल ऑडिट टेबलला पाठवण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक अनंता सखाराम कानडे वय-29 वर्षे याने तक्रारदार यांचेकडे पंच साक्षीदारा समक्ष 3 हजार रुपयेची लाचमागणी करुन 3 हजार रूपये लाच रक्कम पंच, साक्षीदारासमक्ष स्वतः स्वीकारली आहे. आरोपी लोकसेवक यास ताब्यात घेण्यात आले असून त्याचे विरुद्ध आनंदनगर पोलीस ठाणे, जिल्हा धाराशीव येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये सापळा अधिकारी नानासाहेब कदम, पोलीस निरीक्षक, पर्यवेक्षण अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव, मार्गदर्शक संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, सापळा पथक  पोलीस अमलदार सिध्देश्वर तावसकर, विशाल डोके, अविनाश आचार्य, आशिष पाटील यांचा समावेश होता.

 
Top