धाराशिव (प्रतिनिधी)- बेकायदेशीर  तलवार घरात ठेवून फिरणाऱ्या सुरज दिलीप इंगळे यास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने धाराशिव शहरातील गावसूद रोड येथे पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हा शाखेचे पथक गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की, एका युवकाने बेकायदेशीर रित्या घरात तलवार बाळगली असल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने तुळजापूर नाका, गावसूद रोड येथे जावून अधिक चौकशी केली असता सुरज दिलीप इंगळे यांच्या घरामध्ये बेकायदेशीररित्या लोखंडी तलवार मिळून आली. या प्रकरणी पोलिसांनी तलवार जप्त करून सदर युवकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक, गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पोहेकॉ सय्यद, पोना जाधवर, नितीन जाधवर, ढगारे, चालक लाटे, पोकॉ किंवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 
Top