धाराशिव (प्रतिनिधी)- सुक्षेत्र शांतलिंगेश्वर विरक्त मठ, नंदगांव, ता.तुळजापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या जयंतीनिमित्त माजी मंत्री बसवराज पाटील यांनी अभिवादन केले. 

सुमारे 12 व्या शतकांच्या पूर्वार्धात महामहिमामय शिवयोगी शांतलिंगेश्वरांनी स्थापन केलेला हे एक प्राचीन मठ आहे. राज्यातील एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून सदरील मठ प्रसिद्ध आहे. पू.वैराग्य मूर्ती शांतलिंगेश्वर यांनी आपल्या तपोबलाने हा भूभाग जागृत केला आणि भक्तांच्या दुःखाचे निरसन केले. श्री मठ नेहमीच भक्तांच्या सकारात्मक विचारांचे केंद्र राहिले आहे. अशा प्रसन्न वातावरणात घालवलेले मोजके क्षण देखील उर्जादयी आहेत. असे माजी मंत्री पाटील यांनी सांगितले. 

श्री म.नी.प्र.राजशेखर महास्वामी, श्री म.नी.प्र.मरुळसिद्ध महास्वामी माडयाळ, प.पु.शिवानंद स्वामी बेळगी, प.पु.शिवलिंग स्वामीजी वागदरी, प.पु.शिवप्रसाद स्वामीजी शिवमंदिर, प.पु.शिवयोगी स्वामीजी अणदूर यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी गुरुनाथ बडुरे, राजाभाऊ मुंडे, सरपंच वैभव पाटील, विनोद पाटील, शिवानंद कतले, माजी उपसभापती गोविंद पाटील, धनराज पाटील, देवेंद्र कंटेकुरे, वैजनाथ गुळवे, अभिषेक कोरे, महाबळेश्वर तोडकरी, विश्वनाथ शेटे व ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top