धाराशिव (प्रतिनिधी) - गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्यावर येरमाळा पोलिसांनी कारवाई करून गोवंशीय जातीचे 22 वासरे, 3 जर्शी गाय व एक मयत जर्शी गाय, वाहनासह असा एकुण 8 लाख 56 हजार रूपये किंमतीचे जनावरे व वाहन जप्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, येरमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस येरमाळा हद्दीत रात्रगस्त पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की, छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर  जाणारे एनएच 52 रोडवर रत्नापूर पाटीजवळ अंदाजे 100 मीटर अंतरावर एक महिंद्रा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा पिकअप क्र. एमएच 12 ईएफ 9813 व आयशर कंपनीचा टेम्पो क्र. एमएच 42 एक्यु 8687 या दोन्ही वाहनामध्ये गोवंशीय जनावरे भरलेले महिंद्रा कंपनीचा पांढरे रंगाचा पिकअप व ईटकरी रंगाचे आयशर वाहने येणार असल्याची माहिती मिळाली.  येरमाळा पोलीस ठाण्याचे पथक हे मिळालेल्या माहितीवर लागलीच जावून अचानक छापा मारला. तसेच सदरील महिंद्रा कंपनीचा पांढरे रंगाचा पिकअप व आयशर टॅम्पोचे पथकाने निरीक्षण केले असता त्यामध्ये गोवंशीय जनावरे भरलेली दिसुन आली. सदरील वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता इरफान नझीर कुरेशी, वय 43 वर्षे, रा. रसुलपुरा धाराशिव ता. जि. धाराशिव असे सागिंतले. तसेच महिंद्रा पिकअपचा चालक व किन्नर पळून गेले. महिंद्रा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा पिकअप व आयशर टॅम्पो मध्ये गोवंशीय जातीचे 22 वासरे, 3 जर्शी गाय व एक मयत जर्शी गाय वाहनासह असा एकुण 8 लाख 56 हजार रूपये किंमतीचे जनावरे व वाहन मिळून आले. पथकाने नमुद आरोपीविरुध्द पोलीस ठाणे येरमाळा येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5(अ),(1)(2),5(ब) प्राण्याच्या निर्दयतेने वागविण्यात प्रतिबंध कायदा कलम 3, अन्वये गुन्हा नोदंवला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन, यांच्या मार्गदर्शनाखाली येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षिरसागर, पोलीस  उपनिरीक्षक जाधव, पोलीस हावलदार चाफेकर, पोलीस नाईक जमादार यांचे पथकांनी ही कारवाई केली.

 
Top