तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या  आर्य चौकात सतत  बेशिस्त वाहनांमुळे येथे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे याचा फटका स्थानिक नागरिक व भाविकांना बसत आहे.

श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविक खाजगी वाहनाने येतात. येणाऱ्या प्रत्येकाला आपले वाहन मंदिराजवळ उभे करून लवकर देवीचे दर्शन घ्यावे. यासाठी अनेक जण वाहने मंदिराच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होते. बसस्टँन्ड पासुन रिक्षावाले मंदिराकडे जाणाऱ्या भाविकाला कमान वेस मार्ग, आर्य चौक येथे रिक्षा घेऊन येतात. तसेच अनेक खाजगी वाहने आर्य चौकापर्यंत येत असल्याने हे एकत्रित येथे  आले कि या भागात वाहतुकीची कोंडी होते. येथील रस्ता अरुंद असल्याने मोठी वाहतूक कोंडी अधिक ञासदायक ठरत आहे. 

आर्य चौकातील वाहतूक कोंडीबाबत अनेक वेळा संबंधित प्रशासनास सांगूनही ते कानाडोळा करत आहेत. येथील वाहतूक कोंडीमुळे सहा महिन्यापूर्वी एका वकिलाचा बळी गेला आहे. तरी पण प्रशासन जागे होत नाही. तसेच शहरातील कुठल्याही राजकीय पक्ष, सामाजिक संस्था याबाबत आवाज उठवत नाहीत असे वाटते. राजकीय पक्ष व प्रशासन दुर्लक्ष मागे काय कारण आहे याची चर्चा सर्वञ चर्चिली जात आहे.

 
Top