तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सलगरा (दि) प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवार दि. 23 मे रोजी राञी कुणीही आरोग्य कर्मचारी नसल्याने जखमी   झालेल्या नऊ वर्ष वयाचा मुलाच्या जखमेवर खुद्द  पित्यानेच मलमपट्टी केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.आरोग्यमंञी तानाजी सावंत हे पालकमंञी असलेल्या जिल्हयातील तुळजापूर तालुक्यातील आरोग्य सेवेचा पर्दाफार्श या घटनेने झाला आहे. 

या बाबतीत अधिक माहीती अशी की, तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, या आरोग्य केंद्रात पंचक्रोषीतील दहा बारा गावचा भार आहे. सलगरा (दि) येथील शेतकरी निस्सार मौला शेख यांचा मुलगा शब्बीर शेख वय 9 हा घरात  झोपेत पलंगावर पडल्याने त्यास कपाळाला जखम होवुन रक्त वाहु लागला. त्यास वडिलांनी सलगरा (दि) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारास आणले. तिथे एकही कर्मचारी नव्हता. मुलाचा कपाळावरील जखमेतुन रक्त वाहु लागल्यामुळे अखेर पित्याने तिथे जमेल तशी मलम पट्टी केली. या घटनेने जिल्हयातील आरोग्य  सेवेचा अनागोंदी कारभार उघडा पडला आहे.

 
Top