धाराशिव (प्रतिनिधी)- येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले हायस्कूलने दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही एस.एस. सी. बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. तब्बल 15 विद्यार्थ्यांनी 100 % गुण अर्जित केले असून प्रशालेचा एकूण निकाल 98 . 97% इतका लागला आहे.  

प्रशालेतून प्रथम हर्षद संतोष तोडकरी, द्वितीय प्राची युवराज सुर्यवंशी, तृतीय महादेव शिवाजी शेलार असून  यांना 100 % गुण प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठी विद्यार्थी  संख्या असलेल्या या मराठी प्रशालेत या वर्षी 10 वीला 877 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी 90 ते 99 % घेतलेले 183 विद्यार्थी तर 70 ते 89 % घेतलेले 421 विद्यार्थी. तर 35 ते 69. 99% घेतलेले 249 विदयार्थी असे 877 पैकी तब्बल 868 विद्यार्थी पास झाले आहे. फक्त 9 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असले तरी ते 11 वीला प्रवेशासाठी पात्र झाले आहेत.

या यशाबद्दल संस्थेच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचे व पालकांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी केला. यावेळी आपल्या भाषणात ते म्हणाले की, धाराशिव मध्येही आता वैद्यकिय व अभियंत्रिकी शिक्षणासाठी असलेल्या पूर्वतयारीची श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेजमध्ये उत्तम तयारी करून घेण्यासाठी  राजस्थान व इतर राज्यातील प्राध्यापकांनी फोटॉन बॅच उपलब्ध केली आहे. यावेळी संस्था सचिव प्रेमाताई पाटील, मुख्य  कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, संतोष कुलकर्णी, यु.व्ही. राजे, साहेबराव देशमुख, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, संतोष घार्गे, प्रमोद कदम तर सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व पत्रकार आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत पाटील व संदीप जगताप यांनी केले. तर शेवटी आभार प्राचार्य / मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे यांनी मानले.

 
Top