परंडा (प्रतिनिधी)-दिव्यांग उद्योग समुह (महाराष्ट्र राज्य) संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या पाठपुराव्यामुळे धाराशिव जिल्हायातून परंडा तालुक्यातून कौडगाव ता.परंडा या गावातील दिव्यांग शारदा संतोष कुलकर्णी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने  दिव्यांग ई रिक्षा योजना परंडा तालुक्यातील एकमेव लाभार्थी ठरले आहेत. त्यामुळे दिव्यांग मध्ये सर्वत्र आनंदाचे वातवरण निर्माण झाले आहे. 

दिव्यांगाच्या मनामध्ये  महाराष्ट्र शासना बद्दल आपुलकी निर्माण झाली आहे.व हे शासन दिव्यांगासाठी विविध योजना राबवणारे शासन आहे. असे दिव्यांगाने म्हटले आहे. लाभार्थ्याला मिळालेल्या गाडीचे परंडा येथे दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने ई रिक्षाची पुजा करताना दिव्यांग उद्योग समुह (महाराष्ट्र राज्य) संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. यावेळी लाभार्थी सौ.शारदा संतोष कुलकर्णी,  दिव्यांग उद्योग समुह (महाराष्ट्र राज्य) परंडा शहर अध्यक्ष तथा पत्रकार गोरख देशमाने, स्वानंद कुलकर्णी, विद्याधर कुलकर्णी आदि उपस्थित होते.

 
Top