धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयोस्तु प्रतिष्ठान धाराशिव येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखणीय कार्यरत 31 महिला क्रीडा, सामाजिक, धुनेभांडी, वैद्यकिय, सफाई कामगार, छायाचित्र, शासकीय क्षेत्रात कार्यरत नारी शक्तीचा सन्मान शाल, पुस्तक, सन्मानचिन्ह देऊन आमदार कैलास पाटील यांचे हस्ते गौरविण्यात आले.

या जयंती उत्सवाचे प्रमुख पाहुणे धाराशिव -कळंबचे आमदार कैलास पाटील, विद्यापीठ सदस्य पत्रकार देविदास पाठक, श्रीपतराव भोसले हायस्कूलचे कलाध्यापक शेषनाथ वाघ, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, चेअरमन विक्रम पाटील, माजी न .प. सदस्य सोमनाथ गुरव, डॉ.अनिरुद्ध कुलकर्णी, प्रमुख धनंजय जेवळीकर, महेश वडगावकर यांचे हस्ते प्रतिमा करण्यात आले.  या सन्मान सोहळ्यासाठी अंबादास दानवे, प्रभाकर चोराखळीकर, पंकज पाटील, अभिजीत रोदंवे, शरद वडगावकर, श्यामराव दहिटणकर आदि मान्यवर उपस्थित होते. जयंती उत्सवासाठी सुदर्शन कुलकर्णी, शिक्षक राहुल तुगावकर, अक्षय कुलकर्णी, शेखर वडगावकर, सुमीत आचरेकर, सारंग जोशी, जयोस्तु प्रतिष्ठानचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन शिक्षक सचिन हुलसुरकर, सारंग जोशी यांनी केले. तर सुदर्शन कुलकर्णी यांनी आभार मानले.

 
Top