धाराशिव (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीसाठी महायुती, महाविकास आघाडीच्या प्रमुख उमेदवारांनी 27 एप्रिलपर्यंत केलेल्या खर्चाचा हिशोब निवडणूक निरीक्षकांकडे सादर केला आहे. सादर करण्यात आलेल्या 24 ते 27 एप्रिल दुसऱ्या तपासणी खर्चामध्ये परत एकदा तफावत आढल्याने उमेदवार यांना म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे.

ओमराजे यांनी 28.50 लाख तर अर्चना पाटील यांनी 9 लाख 58 हजार रूपयांचा खर्च सादर केला आहे. पण निवडणूक विभागाच्या नोंदीनुसार अर्चना पाटील यांनी 47 लाख 40 हजार तर ओम राजेनिंबाळकर यांनी 42 लाख 83 हजार रूपये खर्च केले आहेत. 1 मे रोजी झालेल्या तपासणीनुसार खर्चात तफावत आढळल्याने महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. निवडणूक खर्चाची तिसरी तपासणी 5 मे रोजी करण्यात येणार आहे. 


 
Top