तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमामध्ये भगवद्गगीतेमधील अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा मजकूर तसेच मनुस्मृतीतील काही श्लोक यासारख्या विज्ञानवादाला धरून नसणाऱ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये जातीवादी मनुवादी सरकार समाविष्ट करू पाहत आहे. याचा जाहीर निषेध करुन हा निर्णय सरकारने मागे घ्यावा. अशी मागणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडीया आठवले गटाने राज्यपाल यांना निवेदन देवुन केली आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, या निर्णय माध्यमातून  समाजाला अंधश्रद्धेकडे घेऊन जाण्याचा गोष्टीचा घाट घातला जात आहे. याचा निषेध सर्व परिवर्तनवादी स्त्री-पुरुष नागरिकांमधून निवेदनाच्या माध्यमातून जाहीर निषेध  करीत आहोत. महाराष्ट्र हा छञपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, छञपती शाहू महाराज, महामानव ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक वातावरणाला मोठी परंपरा आहे. या सर्व महापुरुषांच्या शैक्षणिक विचारावर महाराष्ट्र उभा आहे. म्हणून सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घेऊन, याच महापुरुषांचे विचार अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करून महाराष्ट्र पर्यायाने देश कसा बलवान होईल याकडे अधिक लक्ष देणे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हितावह आहे. असे निवेदनात महाराष्ट्र शासनाला तसेच महामहीम राज्यपाल यांच्याकडे नमूद करण्यात आले आहे. अन्यथा रिपब्लिकन पार्टी तुळजापुर तालुक्याच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे निवेदन तानाजी कदम जिल्हा सरचिटणीस, दाजी माने तालुका उपाध्यक्ष, प्रकाश कदम विधानसभा अध्यक्ष, विष्णु सोनवणे युवक तालुकाध्यक्ष, अरुण कदम शहराध्यक्ष, अमोल कदम, आप्पा कदम आदिंनी दिले.

 
Top