तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद  ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कार्यालयाच्या ढिसाळ  कारभाराचा फटका ऐन दुष्काळी संकटात ग्रामीण भागाला बसत आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग कार्यालयातील अधिकारी सह कर्मचारी वर्ग मालदार कामे वेगाने करीत असुन, इतर कामे माञ संथगतीने करीत आहेत.  जिथे दाम कमी तिथे काम कमी असा कारभार या कार्यालयाचा चालु आहे  यंदा तालुक्यात दुष्काळ असताना पाणी पाणीटंचाई निवारण योजने अंतर्गत तुळजापूर तालुक्यात तीव्र पाणीटंचाई पार्श्वभूमीवर विविध पाणी प्रकल्पातुन पाणीपुरवठासाठी तेरा टँकर भरणा केंद्र टेंडर काढले. आज महिना होत आला व उन्हाळा संपत आला तरीही टँकर भरणा केंद्र टेंडर ओपन केले गेले नाहीत.

या बाबतीत जिल्हापरिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग कार्यालयातील उपअभियंते सरवदे यांच्या.शी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, गावांची मागणी नसल्याने टेंडर ओपन केले नसल्याचे सांगितले. गावांची मागणी नसेल तर टँकर भरणा केंद्र स्थळ निश्चित कसे केले. तसेच या पाणी स्ञोञावर गावे कसे जोडले. तेरा टँकर भरणा केंद्र इस्टीमेट कशासाठी केले. कुण्या आधारे केले, यासह अनेक प्रश्न निर्माण होत आहे. असा हा ढिसाळ कारभार या कार्यालयचा चालु आहे.

या कार्यालयात अधिकारी कर्मचारी कधी ही कामासाठी आलेल्या मंडळी ना सापडत नाहीत  ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाचा कारभार आंधळे दळतय कुञ पीठ खातय असा झाला आहे. शाषण जनतेला पाणीपुरवठा करण्यासाठी गल्ली पासुन दिल्ली पर्यत प्रयत्न करीत असल्याने पाणीस्ञोंन मध्ये पाणी असताना अधिकारी वर्गाचा बेजबाबदार कारभारा मुळे नागरिकांना पाणीटंचाई स सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे येथील ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी यांच्या कडे कार्यकारी अभियंता पदाचा पदभार आहे. तुळजापूर तालुक्यात रामदरा पाचुंदा बोरीधरण आरळी खंडाळा निलेगाव अचलेर शेळगाव शहापूर तामलवाडी पाचुंदा जवळगाव हरणी या साठवण तलावातुन  टँकर भरणा केंद्र साठी टेंडर भरणा  प्रक्रिया महिना भरा पुर्वी करण्यात आली. पण महिना संपुनही व उन्हाळा संपत आला तरीही पाणीटँकर भरणा केंद्र टेंडर ओपन केले नाहीत. पाणीटंचाई निवारण साठी शाषणाने  स्वातंत्र्य बजेट उपलब्ध करुन दिले असतानाही ग्रामीण पाणीपुरवठा तुळजापूर कार्यालय उपअभियंता सरवदे यांच्या अकार्यक्षम पणामुळे ग्रामस्थांना नाहक तीव्र पाणीटंचाई स सामोरे जावे लागत आहे. या पाणीस्त्रोतांमध्ये पाणी भरपूर असतानाही प्रशासनाच्या झारीतील शुक्राचार्यामुळे मानव व मुक्या जनावरांना पाणीटंचाई सामोरे जावे लागले आहे.

अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांन मुळे पाणीटंचाई निवारण कामाला खो बसत आहे .यांच्या मुळे जिल्हयातील बहुतांशी कामांना ब्रेक बसल्याचे बोलले जात आहे,

जिल्हाधिकारी डाँ सचिन ओम्बासे जिल्हावासियांना पाणीटंचाईची झळा बसू नये म्हणून परिश्रम घेत असताना उपअभियंते सरवदे सारख्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे त्यांचे परिश्रम निरर्थक ठरत आहे. कमी पावसामुळे जिल्हयात तीव्र पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली असतानाही कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता नाडगौडा यांची बदली झाल्यानंतर या पदाचा कारभार प्रभारीवर असुन सध्या या पदाचा पदभार  तुळजापूरचे ग्रामीण पाणीपुरवठाचे  उपअभियंता  सरवदे यांच्याकडेच आहे. टंचाई चा महत्त्वाचा प्रश्नाकडे सरवदे यांचे लक्ष नसून मालदार जवजीवन योजने कडेच अधिक लक्ष असल्याचे बोलले जाते.

 
Top